भुसावळ – निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 23 ऑगस्ट 2021 पासून भुसावळ नगर परिषदेतर्फे प्रभाग रचनेच्या तयारीस सुरुवात झाली आहे. सदर रचना निर्मितीमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता असल्याने यावर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे
की, महाराष्ट्र राज्यातील विविध नगरपंचायती, नगर परिषद नगरपालिका यांच्या मुदती येत्या दोन महिन्यात संपत असल्याने होऊ घातलेल्या या निवडणुकांपूर्वी सन 2011च्या लोकसंख्येचा आधार घेण्यात येऊन दिनांक 23 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील या संबंधित नगरपालिका नगरपंचायती व नगरपरिषद यांना त्याच्या नगरपरिषद नगरपंचायत व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील वॉर्डांच्या, प्रभागांची प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केले आहे. पूर्वीची लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा बहू सदस्य वार्ड पद्धतीआयोगाने रद्द करून एक प्रभाग एक नगरसेवक तथा नगरसेवकांच्या मधूनच नगराध्यक्ष निवड करण्याचे आदेश काढलेले आहेत. सदर नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांचे प्रभाग रचना तयार करताना आवश्यक असणाऱ्या त्या ठिकाणच्या भौगोलिक स्थिती,लोकसंख्या तेथील प्रभागातील मुख्य रस्ते,पूल वगैरे सर्व बाबी नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर ठिकाण च्या प्रभागांची रचना करण्यात यावी असेही संपूर्ण राज्यातील होऊ घातलेल्या सर्व नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषद यांना आदेश दिले आहेत. त्यानुसारच सदर स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या शहरातील प्रभागांची प्रारूप रचना तयार करीत आहेत . आणि या आदेशान्वये अ वर्ग असलेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या विविध प्रभागांच्या प्रारूप रचनेच्या निर्मिती साठी प्रारंभ झालेला आहे. भुसावळ शहरातील पूर्वीच्या 24 प्रभागां ऐवजी 48 प्रभागांची निर्मिती होणार आहे.त्यामुळे एका प्रभागातून दोन्हींची एकच नगरसेवक निवडून येणार आहे. मात्र सदर भुसावळ नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या निर्मितीच्या रचनेच्या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. त्याठिकाणी स्वताच्या स्वार्थासाठी काही सदर रचनेच्या निर्मितीच्या कार्यामध्ये निवडून येण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी सदर प्रारूप प्रभाग रचनेत त्यांच्या फायद्याचे विविध भाग, परिसर समाविष्ट करून घेण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून भुसावळ नगर परिषद भुसावळ तर्फे आपल्या आदेशान्वये सुरू असलेल्या प्रभाग रचना निर्मितीच्या प्रक्रियेत निवडणुक आयोगाने विशेष लक्ष घालाण्याची गरज असून सदर भुसावळ नगरपरिषद तर्फे प्रभागांची प्रारूप रचना तयार होत असताना,निर्मिती होत असताना कुणावरही अन्याय होणार नाही ती नि:पक्ष पणे व्हावी. सदर रचनाही महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाने संबंधित नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांना निर्देशित केलेल्या सर्व नियमांना अनुसरूनच व्हावी.व भुसावळ नगर परिषदेच्या प्रभाग रचना प्रक्रियेत विशेष लक्ष घालावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


