भुसावळ – महिला पोलीस आमची काळजी घेतात आम्ही सुद्धा त्यांची काळजी घेतली पाहिजे हे कर्तव्य व जबाबदारी लक्षात घेवून येथील महिला पोलिस कर्मचारी, आर. पी. एफ. महिला कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तज्ञ डॉक्टर्स डॉ. सौ. वर्षा कोळंबे( नेत्र तज्ञ) , डॉ. दिप्ती चौधरी (स्री रोग तज्ञ) डॉ. संज्योत पाटील फीजीशियन) , डॉ. उर्मी ठक्कर (पॅथॉलॉजी) , डॉ. जागृती राणे (जनरल) यानी तपासण्या केल्या.

महिला क्रिडा मंडळ भुसावळच्या अध्यक्षा सौ. आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात सांगितले की महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, स्वतःसाठी औषधे सुध्दा आणत नाहीत. म्हणून आम्ही आर्यन व कॅल्शिअमचा पुर्ण कोर्स देणार आहोत. महिला पोलीस आमची काळजी घेतात आम्ही तुमची काळजी घेऊ असे सांगितले. बाजारपेठ पोलीस निरीक्षक दीलीप भागवत यांनी क्रिडा मंडळाच्या मेंबर्सचे आभार मानले. नंतर आरोग्य तपासणीला सुरवात झाली. डॉ. उर्मी ठक्कर यांनी ब्रेस्ट कॅन्सर साठी स्वतः स्वतःची तपासणी कशी करायची हे प्रात्यक्षिक करून दाखवले. एकुण 32 महिला पोलिसांची तपासणी झाली. पैकी 4 कर्मचा-यांना शुगर व काहींना ब्लड प्रेशर चे निदर्शनास आले. तज्ञांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.प्रगती ओक व आभार प्रदर्शन सौ. जयश्री ओक यांनी केले. अनिता कवडीवाले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिला क्रिडा मंडळच्या सचिव लता होसकोटे , अनिता कवडीवाले , सुनीता पाचपांडे, मंगला पाटील, प्रभा पाटील, अनिता महाजन, वीणा ठाकूर, वैशाली ब-हाटे, प्राची राणे, लता ढाके, प्रमिला नेमाडे ,संगीता मुजूमदार , स्वाती नाईक ,माधुरी गुजर ,माधुरी गव्हाळे , वैशाली भगत, दीपा सोनार इत्यादि उपस्थित होत्या .


