सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व गौसेवा परिवार तर्फ वृक्षारोपण संपन्न ;



भुसावळ –
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व गौसेवा परिवार तर्फे १५ आॅगस्ट निमित्त व संस्था अध्यक्ष सौ.राजश्री नेवे यांचे वाढदिवसा निमित्त तापी नदी परिसरातील रेणुका देवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले,
गेल्या दोन महिन्यां पासुन संस्था सदस्यांचे जन्मदिना निमित्त विविध ठिकाणी जसे कार्यालय, मंदिर, परिसर, खुली मैदाने, काॅलनी, शाळा असे विविध ठीकाणी वृक्षारोपण करत आहे, याचाच एक भाग म्हणून १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त व संस्था अध्यक्षा यांचे वाढदिवस निमित्ताने मंगळवारी वृक्षारोपण केले .
यावेळी माया चौधरी, अनुराधा टाक, वंदना झांबरे, मिरा शर्मा, आराधना टाक गौसेवा परिवार चे रोहीत महाले, चेतन ठाकूर, दुर्गेश झोपे, अनिकेत साळी, हेमंत पाटील, गौरव साळी, क्रिषी नेवे, हे उपस्थित होते,