भुसावळ – शहर महिला कॉग्रेस कमेटी तर्फे गौसीया नगर येथील १२ शौचालय दुरुस्ती बाबत नगरपरिषद चे उप-मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात गौसीया नगर मुस्लिम कब्रस्थान येथील १२ शौचालय असून त्यात ६ महीला व ६ पुरुषांची आहे. या शौचालयाची अवस्था अत्यत खराब झालेली आहे. त्या करीता महीला कॉग्रेंस कमेटी तर्फे निवेदन देऊन त्वरीत शौचालय दुरुस्त करावी. अशी मागणी करण्यात आली असून याबाबत निवेदन देण्यात आले आहे .
या प्रसंगी भुसावळ शहर महीला कॉग्रेसची अध्यक्षा यास्मीन बानो शे युसुफ,शहर उपाध्यक्ष हमीदा गवली,जिल्हा उपाध्यक्ष रानी खरात,सूजाता ताई सपकाळे ,वंदना ताई चव्हाण,दुर्ग बाई सोनोवणे, जिल्हा अल्पसंख्यॉक विभागचे जिल्हा अध्यक्ष मो मुनव्वर खान, भुसावळ विधानसभा युवा अध्यक्ष ईम्रान खान,शहर अध्यक्ष अल्पसंख्यॉक विभाग सलीम गवली,शहर उपाध्यक्ष विलास खरात,शहर सचीव शैलेश अहीरे,असगर भाई व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,


