भुसावळ –
आज सर्वचजण इंजीनिअर व डॉक्टर क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. याक्षेत्रात अतिशय जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. नीट परिक्षेला देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कीती विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे जाण्याची संधी मिळते हे देखील बघणे गरजेचे आहे. एवढे करूनही पुढील भविष्याबाबत अनेक अडचणी येत असतात. याकरीता पॅरामेडीकल हि रोजगाराच्या दृष्टीकोनातून एक चांगली संधी असल्याचे प्रतिपादन नाहाटा कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे यांनी केले.
आर्या फाउंडेशन संचालित अध्ययन पैरामेडिकल कॉलेज मध्ये आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे यांच्या उपस्थितित दोन दिवशीय प्राथमिक उपचार शिबिर घेण््यात आले . या शिबिरात चेस्ट फिजीशीयन डॉ. स्वप्निल चौधरी मेंदूरोग तज्ञ डॉ. कांचन नारखेडे स्त्रीरोग तज्ञ डॉ. विक्रांत सोनार एम.डी फीजीशियन डॉ. राजेश मानवतकर, योगगुरु वसंत बड़ेल आदि उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्ययन पेरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य प्रा. मनीषा बाविस्कर यांनी केले.

त्यानंतर डॉ. विक्रांत सोनार यांनी प्रथामिक उपचार एखाद्या दुर्घटेनेवेळी कसे महत्वचे आहे हे पटवून दिले. यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक उपचाराची माहिती असणे अवश्यक आहे. यामुळे रूग्णाला दवाखान्यापर्यंत पोहचवता येवू शकते. डॉ. कांचन नारखेडे बोलताना म्हणाल्या की, रात्रीच्या वेळी एखादी दुर्दवी घटना घडल्यास परिवाराच्या सुरक्षिततेसाठी तरी प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात प्राथमिक उपचार शिबीर करणे गरजेचे आहे शिबिरात डॉ. स्वप्निल चौधरी यांनी अत्यंत महत्त्वाचा असा C.P.R या मुद्द्यावार उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकसाहित मार्गदर्शन केले व प्रत्येक विद्यार्थ्यांनकडून C.P.R चे प्रात्यक्षिक करुन घेतले. सनी चव्हाण यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांनी कोणत्या कोर्सेस ला महत्त्व घ्यावे याचे मार्गदर्शन केले. तसेच पॅरामेडिकल स्टाफची खूप कमतरता आहे. तो स्टाफ घडणे खूप आवश्यक आहे. हे कोरोना काळात सिद्ध झाले आहे. कोरोना काळात सर्व बंद असताना फक्त हॉस्पिटल, लॅब, व मेडिकल सुरू होते. असे डॉ. राजेश मानवतकर यांनी प्रतिपादन केले शिबीरार्थीना प्रमाणपत्र प्रदान केले.
आर्या फौंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे यांनी आर्या फौंडेशनची प्रास्ताविक करून प्रत्येक यशस्वी डॉक्टर्सच्या मागे नेहमी एक बेस्ट पॅरामेडिकल स्टाफ असतो आणि तो बेस्ट पॅरामेडिकल स्टाफ घडवण्याचे कार्य अध्ययन पॅरा मेडिकल कॉलेज करत आहे.असे सांगितले.
पॅरामेडीकल कॉलेजचे रूग्णांप्रती असलेल्या कार्याने प्ररीत होत एक मदतीचा हात देत नागराज जाधव यानी आपल्या आईच्या स्मरणार्थ आर्या फाउंडेशन संचालित नवजीवन व्यसनमुक्ति केन्द्रास 4 बेड दान केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर्या फौंडेशन संचालित हिरकणी महिला मंचच्या अध्यक्षा सुवर्णा इंगळे, उपाध्यक्ष: अंजुम खान, सचिव: बबिता सिंग यांनी केले. पौर्णिमा पाटील व छाया चौधरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व स्टाफ , हिरकणी महिला मंचाची संपूर्ण टीम, नवजीवन व्यसनमुक्ती केंन्द्राचा स्टाफ तसेच अंजली दीक्षित सुनीता बागुल, पिंकी जड्डे ,जया बोराडे,एशवर्या भालेराव प्रशान्त सोनार , हर्षाली पाटिल , सारिका बढ़े, रेखा कोलते यांनी परिश्रम घेतले.


