भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २५ जुलै रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन ;


भुसावळ –
येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दि. २५ जुलै २०२१ रविवार रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील A- 36 या वर्गात होणार आहे.
सदरच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक हे तर उद्घाटक म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे तर प्रमुख उपस्थिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजय नाहाटा तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक मंडळ आणि प्राचार्य डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे. उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. शैलेश पाटील, प्रा. ई. जी. नेहेते उपस्थित राहतील. यावेळी कोवीड सारखा भयंकर आजार असल्याने सदरचा मेळावा हा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

या मेळाव्यात सुमारे १५० विविध शहरातील माजी विद्यार्थी सहभाग घेणार आहे. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या कोणत्या अपेक्षा आहेत यावर तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत कोणते योगदान द्यावे या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच आजी विद्यार्थ्यांकरीता माजी विद्यार्थी संघटनेने कोणकोणते विविध गुणांच्या अनुषंगाने उपक्रम राबवावे या विषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन उपस्थितांचे लाभणार आहेत. आपणास मेळाव्याची ऑनलाईन जॉईन होण्याची लिंक हवी असल्यास मेळावा समन्वयक माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा. हर्षल पाटील मो. नं. 8975114205 यावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील, सचिव प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांनी केले आहे. तर मेळावा यशस्वीतेसाठी आशिष चौधरी. प्रा. चंद्रकांत सरोदे, डॉ. गौरी पाटील, डॉ. अजय सुरवाडे, प्रा. दीपक पाटील, अजय भोळे, संतोष विनंते, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा. स्वाती शेळके, प्रा. जय काशिव, डॉ. सचिन येवले, डॉ. उमेश फेगडे, डॉ. कल्याणसिंग पाटील, डॉ. सचिन कोलते, प्रा. शंकर पाटील, प्रा. जितेंद्र आडोकार परिश्रम घेत आहेत.