वीजेच्या खांबाला धक्का लागल्याने शॉक लागून गायीसह महिलेचा जागीच मृत्यू ;


भुसावळ – तालुक्यातील वराडसीम येथील ५५ वर्षीय महिला गायीला पकडण्यासाठी गेल्या असतांना विद्यूत प्रवाह उतरलेल्या वीजेच्या खांबाला धक्का लागल्याने गायीसह महिलेचाजागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजता घडली . याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.
कमल सुरेश पाटील (वय ५५, रा. वराडसीम ता. भुसावळ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. कमलबाई ह्या शेतमजूर असून मुलगा गजानन पाटील आणि सुन शितल यांच्यासोबत राहतात. शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. आज बुधवारी २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता गवत चारा वगैरे चरण्यासाठी मोकळया सोडलेल्या गायीला धरण्यासाठी त्या गेल्या होत्या दरम्यान त्यावेळी पाऊस झाल्याने संपुर्ण परिसर ओला झालेला होता.
गाय चरत विद्यूत प्रवाह उतरलेल्या खांबाजवळ गेल्याने तीला अचानक वीजेचा धक्का लागल्याने गाय जागीच मृत पावली . त्यानंतर कमलबाई ह्या देखील तेथे गेल्या त्यांना देखील विजेचा जोरदार धक्का बसला व त्यादेखील जागीच ठार झाल्या. त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.