भुसावळ (प्रतिनिधी) : येथील रहिवासी गं.भा. इंदुमती दिनकर महाजन (वय ८२) यांचे आज पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ३ ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी १० वाजता भुसावळ येथील कस्तुरी साडीज, ब्राह्मण संघ, जामनेर रोड, आयडीबीआय बँकेच्या शेजारी येथील निवासस्थानावरून निघनार आहे. त्या भुसावळ येथील सुप्रसिद्ध कस्तुरी साडीजचे संचालक किरणशेठ महाजन यांच्या मातोश्री, तर कजरी मेन्स वेअरचे संचालक महेशशेठ व शैलेशशेठ महाजन तसेच डॉ. निलेश महाजन यांच्या मोठ्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


