लग्न जमलेल्या अल्पवयीन तरुणीस पळवले : सहा जणांविरोधात गुन्हा :


यावल – तालुक्यातील गाडर्‍या येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी यावल पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील गाडर्‍या येथील 17 वर्षीय मुलीचे लग्न जमले असून 12 जुलै रोजी तरुणी आपला चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला व तिचा नियोजित पती रवी हुकार्‍या बारेला (रा.वाघझिरा) हे तिघे दुचाकीवर वाघझिरा येथे जात असताना सातपुड्याच्या जंगलात सहा संशयीत आरोपींनी या तरुणीला पळवून नेले. आठ दिवस सदरील अल्पवयीन मुलीस वालपाणी, सुतपूरी मध्यप्रदेश येथे ठेवण्यात आले तसेच भगवानपूरा पोलिसांकडे या अल्पवयीन मुलीस पोलिसां समक्ष खोटा जबाब देण्यास भाग पाडण्यात आले. यावल पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्यानंतर मंगळवारी तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
अल्पवयीन तरुणीचा भाऊ व नियोजित पती यांना मारहाण करीत तरुणीला पळवून नेल्याच्या आरोपावरून संशयीत आरोपी जागीराम गुलाब बारेला, नेमसिंग जागीराम बारेला, अनेरसिंग गुलाब बारेला, शांताराम गुलाब बारेला, नितेश जागीराम बारेला (सर्व रा.पलासकोट, ता.भगवानपूरा, जि.खरगोन (ह.मु.गाडर्‍या, ता.यावल) व मंसाराम मदरास बारेला (रा.वालपानी, ता.भगवानपूरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, हवालदार संजय तायडे करीत आहेत.