भुसावळ : तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर उर्वरित तक्रारी बाबत त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी ,अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 जुलै 2021 रोजी राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .
सविस्तर असे की भुसावळ पंचायत समिती अंतर्गत खंडाळा ग्रामपंचायत मध्ये 2015 ते 2020 या कालावधीत रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन,14 वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधारक, या योजनांमध्ये सरपंच, उपसरपंच, व ग्रामसेवक यांनी संगणमत करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे व त्या सर्व योजनानिहाय तक्रारी गट विकास अधिकारी,पंचायत समिती भुसावळ यांच्याकडे केलेले आहे . त्याला आतापर्यंत दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी सदर चौकशी केली असता सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, या चौकशी अंती दोषी आढळले आहे मात्र यांच्यावर अदयापही गुन्हे दाखल नाही दलित वस्ती सुधार, 14 व्या वित्त आयोग, या तक्रारीची सुद्धा चौकशी नाही हा सुट्टीवर गेला तो सुट्टीवर गेला असे उत्तर देऊन वेळ काढूपणा करत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यानी आपल्या स्तरावर या सर्व प्रकरणाची चौकशी करीता एक समिती नेमून चौकशी करावी व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात येवून मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिनांक 22 जुलै 2021 गुरुवार रोजी उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा देवून तक्रारदाराला सोबत घेऊन चौकशी करावी असेही निवेदनात नमूद केले आहे .
निवेदनावर राष्ट्रीय दलित पॅंथर चे जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे, यांच्या सह्या आहेत.



