बियाणी मिलिटरी स्कूल चा निकाल शंभर टक्के :

भुसावळ (वार्ताहर) :
दिनांक 16 जुलै रोजी इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आला यात बियाणी मिलिटरी स्कूल व बियाणी पब्लिक स्कूल या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले व शाळेची 100% निकालाची परंपरा कायम राखली .
यात बियाणी मिलिटरी स्कूल मधून सौरव शिवाजी पाटील 94 टक्के गुण मिळवून प्रथम,तर जयदीप चंद्रकांत पाटील 92.80 टक्के गुण मिळवून द्वितीय व यज्ञेश सतीश पाटील 91.1 80 टक्के गुण मिळवून तृतीय तसेच गौरव सुनील खडसे व अथर्व विजय कोलते यांनी प्रत्येकी 91.80% गुण मिळवले.
तसेच बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ या शाळेतून नन्हेलाल गुर्जर 95.60 टक्के गुण मिळवून प्रथम व शुभम गजानन बावस्कर 93.20% मिळून द्वितीय व नेहा छत्तरसिंग बारेला 91 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. उर्वरित सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. अशाप्रकारे दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष मनोज बियाणी,उपाध्यक्ष विनोद बियाणी, सचीव डॉ.संगीता बियाणी संचालक रोनक बियाणी तसेच शाळेचे प्राचार्य डी एम पाटील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
शाळेचे अध्यक्ष मनोज बियाणी व सचिव डॉ संगीता बियाणी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.