भुसावळात शिवसंपर्क अभियानांतर्गत खडका रोड विभागात वृक्षारोपण आणि शिवसेना सदस्य नोंदणी ; नागरिकांनी मांडल्या समस्या ;

भुसावळ-
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने १२ जुलै ते २४ जुलै या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत भुसावळ दक्षिण भागातील खडका रोड, जाम मोहल्ला, पापा नगर, मील्लत नगर, गुंजाळ कॉलनी, तळेले कॉलनी, पाटील मळा, विभागात सोमवारी, १९ जुलै रोजी समस्या निवारण मोहीम राबविण्यात आली. वृक्षारोपण आणि शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली.
भुसावळ शहरातील दक्षिण भागात शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन, नागरिकांशी संवाद साधला. वीज, पाणी, घंटागाडी, आरोग्य, वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारी, परिसर स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, पथदीप, रेशनिंगचे धान्य आदींबाबतच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित खात्याशी संपर्क साधून या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उर्दू विभागाचे इलियास शेख, उपशहर प्रमुख अन्सार शाह, पवन नाले, नबी पटेल, आसिफ मोटू, अकिल तडवी, इद्रिस बागवान, सिकंदर गवळी, साबीर हजाम, मनोज पवार, शेख मेहमूद, कैलास लोखंडे, पवन मेहरा, हेमंत बऱ्हाटे, सुरज पाटील, दिव्यांग सेनेचे विनोद गायकवाड, शरद जैसवाल, गजानन निळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या हितासाठी करीत असलेल्या कार्य, जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय आणि याबाबत जनतेचे प्रबोधन या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना शिवसेनेचे कान आणि डोळे असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या शिवसंपर्क अभियानातुन जनतेच्या समस्या जाणून घेतील व त्या सोडवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवतील अशी ग्वाही जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली.