भुसावळात उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे ओबीसी आरक्षण पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन –

भुसावळ –
सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे राजकीय आरक्षण घटनात्मक पुर्ततेअभावी रद्दबादल केले असून.ना.छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात रास्ता रोको आंदोलन , उपोषण तसेच आरक्षणपे चर्चा अशा विविध कार्यक्रमांनी ओबीसींचा आक्रोश बाहेर येतांना दिसत आहे. एक दिवस आपला हक्क अधिकार समजून घेऊन ओबीसीच्या भटक्या वंचित बहुजन शेवटच्या घटकांपर्यंत चर्चा करण्यासाठी उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो !

एकच पर्व ओबीसी सर्व
आरक्षण पे चर्चा नियोजित कार्यक्रम दिनांक 17/7 /2021 शनिवार दुपारी 12 वाजता माळी भवन हॉटेल सुहास जवळ भुसावळ येथे बाळासाहेब कर्डक
(विभागीय अध्यक्ष-उत्तर महा.)
रविभाऊ सोनवणे
(स्विय सहाय्यक भुजबळ साहेब) अँड प्रतीक कर्डक
नितीन शेलार
(निरीक्षक उत्तर महाराष्ट्)
अनिल नळे
(संघटक उत्तर महाराष्ट्र) यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात आला आहे .
तरी भुसावळ तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध समाजाचे अध्यक्ष ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
समन्वयक समिती कैलास शामराव माळी , संतोष बळीराम माळी , प्रा.धीरज पाटील ,शिशिर जावळे ,विजय मधुकर माळी , भुसावळ तालुका ओबीसी आरक्षण समन्वयक समितीने केले आहे .