भुसावळ –
शिवसंपर्क अभियानाअंतर्गत महिला आघाडी जोमाने कामास लागल्या असून या रणरागिणीच्या माध्यमातून शिवसेनेचा झंझावात पाहाता भूसावळ तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला होता व कायम राहिल असे चित्र स्पष्ट होत आहे .
वरणगाव तालुका भुसावळ येथे नुकतेच शिवसंपर्क अभियानाला जोरदार प्रारंभ झाला याअंतर्गत प्रभाग क्रमांक 16 व प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेना महिला आघाडीच्या दोन शाखांचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी संपर्क संघटिका श्रीमती उषाताई मराठे सेनाभवन मुंबई यांचे हस्ते व जिल्हाप्रमुख शिवसेना समाधान महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शिवसेना शाखा उद्घाटन प्रसंगी उषाताई मराठे यांनी उपस्थित शाखाप्रमुख ,उपशाखा प्रमुख खजिनदार यांना शिवसेनेचे ध्येयधोरणे समजून सांगितली व महिलांनी घरोघर जाऊन संघटना वाढवावी व इतर महिलांच्या कामात यावे जेणेकरून संघटना वाढेल व मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचतील असे प्रतिपादन शाखा उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी महिला जिल्हा संघटिका पुनम ब-हाटे , तालुका संघटिका भुराबाई चव्हाण उपतालुका संघटिका योगिता सोनार योगिता कोळी यांचेसह शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी ,अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी निलेश ठाकूर, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, जिल्हा परिषद सदस्य सरला कोळी, भुसावळच्या शहर प्रमुख निलेश महाजन माजी शहर प्रमुख नामदेव ब-हाटे यांचेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक 16 च्या शाखेचा महिला संघटिका म्हणून श्रीमती जयश्री महाजन व प्रभाग क्रमांक 18 च्या शाखा संघटिका म्हणून कमलबाई सुरवाडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी शाखेतील महिला सदस्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते



