भुसावळात अनोळखी तरुणाचा खून ;

भुसावळ –
येथील जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी आवाहन केले आहे .
वृत्त समजताच पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो.नि.दिलीप भागवत, सहकारी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे .
भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असले गजानन महाराज मंदीरा समोर तरुणाचा मृतदेह मिळुन आला आहे. त्यांचेवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कोणीतरी अज्ञातांनी दगडाने चेहरा ठेचल्याचे प्राथमिक माहीतीत दिसून येत आहे .
पोलिसांकड़ून ओळख पटविन्याचे आवाहन
मृताचे वर्णन – वय अंदाजे 35 ते 40 वर्ष ,वर्ण – निमगोरा, उंची अंदाजे 5.3 फुट, अंगाने मध्यम अशा वर्णनाचा आहे.त्याचा चेहरा ठेचलेला दिसत आहे.त्याचे अंगात फिकट हिरव्या रंगाचा हाफ टि-शर्ट,काळे रंगाची फुल पॅन्ट,पांढरे रंगाचे बनियन आहे.सदर इसमास कोणी ओळखत असेल तर खालील नंबर वर संपर्क करावा. सोमनाथ वाघचौरे 7588175278 , पो.नि.दिलीप भागवत , 9423534445, स.पो.नि.क्रुष्णा भोये , 8378843300 , स.पो.नि.गणेश धुमाळ , 8422012261, स.पो.नि.अनिल मोरे , 9922707327 , स.पो.नि.मंगेश गोंटला 9922422622 , स.पो.नि.हरिष भोई 9922258788 ,
असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.