भुसावळ (प्रतिनिधी )-

कोरोनाकाळात रुग्णसेवेसाठी चांगली सेवा तसेच रुग्णालयातर्फे राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याबद्दल रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर भुसावळ चे डॉ.नितीन पाटील यांना केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री राजेश टोपे,सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी मुंबई येथे सन्माणित केले.
त्याबद्दल डॉ नितीन पाटील यांना व्यापारी महामंडल भुसावळ तफै सन्माणीत करण्यात आले. त्यावेळी राधेश्याम लाहोटी,जयंतीलाल सुराणा,नरेंद लढ्ढा,श्याम दरगड,विजय काबरा,गौतम चोरडीया,नितीन सुराणा,कमलेश साखला,द्वारकादास हेडा,महेंद्र कोठारी आदी उपस्थित होते.


