भुसावळ ( प्रतिनिधी )-
आरवी असोसिएट्स आकिटेक्ट्स इंजिनीअर्स कंपनी हैदराबाद यांचे विरुद्ध येथील शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी न्यायालया मध्ये खटला दाखल केला आहे असून न्याय मागीतला आहे .
आरवी असोसिएट्स आकिटेक्ट्स इंजिनीअर्स कंपनी हैदराबाद यांनी चिखली ते तरसोद 54 किलोमीटर नॅशनल हायवे 46 फोरवे चे काम करत असताना जी काळजी घ्यायची ती काळजी न घेतल्यामुळे निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहे व होत आहे . होणारे अपघात व मृत्यु यास कारणीभूत रोड बनवनारी
कंपनी जबाबदार आहे त्यामुळे जिथे जिथे अपघात झाले आहे व त्या अपघातात जे नागरिक मयत झाले आहे व जाच्या मालाचे नुकसान झाले आहे त्याला ही काम करणारी कंपनी जबाबदार आहे. संपूर्ण पणे बॅरिकेट न लावण्या मुळे व जागोजागे गिट्टी मुरूम पडल्यामुळे एक्सीडेंट होत आहे व होत राहतील तसेच रोड रुंदी करण्याच्या नावाखाली 50 ते 60 वर्षा पूर्वीचे वृक्ष तोडून त्या वृक्षांची काळाबाजार केलेला आहे .
म्हणून या निष्काळजी कंपनीच्या विरोधामध्ये न्यायालया मध्ये शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी खटला दाखल केला आहे व न्याय मागीतला आहे



