भुसावळात नागरी सुविधांसाठी रेल्वे अतिक्रमणधारकांचा ठीय्या –


भुसावळ :

शहरातील रेल्वे हद्दीतील बेघर अतिक्रमणधारकांचे यावल रोडवरील सबस्टेशनच्या मागील भागात पुर्नवसन करण्यात आले मात्र तेथे कोणत्या सुविधा नसल्याने संतप्त रहिवाशांनी सोमवारी ठिय्या आंदेालन केले. प्रशासनाने मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली. रेल्वे विभागाने अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर तब्बल 80 कुटूंबियांनी यावल रोडवरील सबस्टेशनच्या मागील भागात असलेल्या भुखंडावर संसार थाटले. तीनवर्ष उलटूनही या भागात मात्र पालिका प्रशासनाने कोणत्याही सुविधा न पुरवल्याचा आरोप आहे
या भागात रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, पथदिवे या मुलभुत सुविधा देखील नसल्याने रहिवाशांना त्रास सोसावा लागत आहे. या भागातील नागरीकांनी या सर्व नागरी सुविधांसाठी गेल्या पंधरवड्यापूर्वी प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले होते, मात्र यानंतरही दखल न घेतल्याने या भागातील रहिवाशांनी सोमवारपासून याच रहिवासी भागात ठिय्या आंदोलन केले. जो पर्यत न्याय मिळत नाही तो पर्यंत दररोज दोन तास ठिय्या आंदोलन करु, असा इशारा रहिवासी मीराबाई मोरे, सरस्वतीबाई बहिरागे, मथुराबाई पवार, सुरेंद्र बागुल, समाधान पवार, नरेंद्र मोरे, शकुंतला गायकवाड, योगेश तायडे, रोहित ठोके, विजय सोनवणे, बेबी सपकाळे, लक्ष्मण सोनवणे, अनिल बाविस्कर, रेखा सोनवणे, प्रज्ञा बाविस्कर, जागृती सोनवणे आदींसह रहिवाशांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *