भुसावळात पर्यावरण संवर्धनासाठी धार्मिक स्थळ परीसरात वृक्षारोपण –


भुसावळ –
पर्यावरण संवर्धन काळाची गरज मानून शहरातील तरुण पीढीने भुसावळातील धार्मिक स्थळ परीसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. दरवर्षी शहरात पर्यावरण दिनानिमित्त हजारो वृक्ष वृक्षांची लागवड केली जाते मात्र संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याने लागवडीवर केलेला खर्च वाया जातो शिवाय वृक्षांचीदेखील वाढ होत नाही माच्त्र ऑक्सीजन निर्मिती करणार्‍या वृक्षांचे महत्व ओळखून तरुण पिढीने शहरात वृक्षारोपण मोहिम राबवून आदर्श निर्माण केला.
भुसावळ शहरातील प्रार्थनास्थळे व धार्मिक स्थळ परीसरात ऑक्सिजन निर्माण करणार्‍या प्रत्येकी पाच मिळून 60 वृक्षांची लागवड करण्यात आली. मराठी अलायन्स चर्च, सिद्धार्थ बुद्ध विहार, गुरुद्वारा, तापी नदी वरील स्मशानीभूमी परीसर, खडका गावातील मुस्लिम कब्रस्तान परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी भुसावळ पत्रकार संघाचे सचिव हबीब चव्हाण, मुख्तार मन्यार, मुस्तफा खाटीक, आबीद पिंजारी, रफिक मण्यार, इब्राहीम खान, अन्सार मण्यार, अल्ताफ पिंजारी, वसीम खान, रोशन पिंजारी आदी तरुणांनी वृक्षारोपण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *