दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पात प्रस्तावित सोलर प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिपनगर प्रशासनाकडून 25 ते 30 वर्ष सुमारे 30 हुन अधिक जुन्या जीर्ण वृक्षाची बेसुमार कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे
भुसावळ जवळील दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील भेलयार्ड तापी काठाजवळील जुन्या रेस्ट हाऊस परिसरात सोलर प्लांटच्या निर्मितीसाठी 30वर्षाहून अधिक जुन्या वृक्षाची कत्तल केली आहे
विशेष म्हणजे झालेल्या कत्तलीतील सर्व वृक्ष ही भारतीय वृक्ष असल्याचे समजले आहे यात आंबा,लिंब,बेहडा, वावडी, निलगिरी,अडुळसा अशा 31 झाडांसह 30 किरकोळ सुबाभूळ व इतर झाडाची कत्तल करून झाडे जागेवरून पसार करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे
या बाबत चौकशी केली असता या वृक्षतोडी बाबत कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी नसल्याचे कळत असल्याने स्थानिक वृक्ष प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे



