दीपनगर –
राज्यात करोना काळामध्ये महाजनकोच्या कंत्राटदाराचा मृत्यू झाला आहे. अशा कंत्राटदारांच्या कुंटूबीयांना कोविड-19च्या कार्यकारी संचालक (मांस) यांच्या परिपत्रकाप्रमाणे लाभ देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेने केली आहे.
याबाबत महाजनकोचे चेअरमन व कार्यकारी संचालक संजय खंदारे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने दीपनगर येथील उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम यांनी निवेदन स्वीकारले. संघटनेचे प्रदेश सचिव प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारणीचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष तेलंग, प्रदेश संघटक प्रकाश तायडे, दीपनगर शाखाध्यक्ष नारायण झटके, सचिव रामचंद्र तायडे हे उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर, तसेच कार्यकारी संचालक (मांस), मुख्य औद्यौगिक सबंध अधिकारी व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांना देण्यात आले, असे प्रदेश संघटक प्रकाश तायडे यांनी कळविले आहे.



