भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील घोडे पीरबाबा मार्गावर रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मातृभूमी चौकातील एक आणि आनंद नगरातील एक असे दोन युवक दुचाकीने जात होते. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली, यात मागे बसलेल्या तरुणाच्या कानातून रक्त आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले. तर दुसरा युवक जखमी झाला. त्यांची नावे समजू शकली नाहीत.




