भुसावळ विभागात एकाच दिवशी 212 मालगाड्यांचे संचालन


भुसावळ (प्रतिनिधी)-
एकाच दिवसात 212 गाड्यांचे इंटरचेंज प्रक्रिया पार पाडण्याचा विक्रम शनिवारी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केला. भुसावळ येथून विविध विभागात गाड्यांचे संचालन करण्यात आले.
मध्य रेल्वे भुसावळ विभागातून शनिवार, 5 जून रोजी माल वाहतूक गाड्यांची रेकॉर्डब्रेक इंटरचेंज (संचालन) करण्यात आले आहे. डीआरएम विवेक कुमार गुप्ता, वरीष्ठ मंडल परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक परीचालन प्रबंधक (माल) योगेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भुसावळ विभागातून अप आणि डाउन मार्गावर अशा एकूण 212 मालवाहतूक गाड्या इंटरचेंज (संचालन) करण्यात आल्या. या इंटरचेंज (संचालन) करण्यात आलेल्या मालवाहतूक गाड्या मुख्यतः पश्चिम रेल्वे, नांदेड विभाग,भोपाळ विभाग, सोलापूर विभाग, मुंबई विभाग आणि नागपूर विभाग या प्रमुख ठिकाणी मालवाहतूक गाड्यांचे वक्तशीरपणामधे इंटरचेंज (संचालन) करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *