भुसावळ (प्रतिनिधी )-

केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल,डिझेल, घरगुती गॅस, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आज सोमवार ७ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
प्रथम योगेंद्र पाटील व विवेक नरवाडे यांच्या हस्ते पंपाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धाजली वाहण्यात आली व पेट्रोल भरायला आलेल्या लोकांना गुलाबपुष्प देऊन केंद्र सरकारचा अनोखा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी, भुसावळ काँग्रेस अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, सागर कुरेशी, सेवादल अध्यक्ष तस्लिम खान, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जवरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


