भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील
साई नगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे सुरु असलेला जुगाराचा डाव पोलिसांनी कारवाई करीत उधळून लावला .यावेळी लाइटाच्या उजेडात दिनांक १५ रोजी पहाटेच्या वेळेस झन्ना मन्ना नावाचा मांग नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना ६ जण मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ शहरातील साई नगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे लाइटच्या उजेडात दिनांक १५/५/२०२१ रोजी ३.१० वाजेला पहाटेच्या सुमारास सार्वजनिक जागी खाली बसून घोळका करून पत्ते खेळताना रतन पुरी गोसावी वय 26 राहणार महेश नगर , अमोल काशिनाथ राणे वय 23 राहणार श्रीराम नगर , गजानन एकनाथ पाटील वय 29 राहणार महेश नगर , प्रशांत उर्फ बबलू नाना सुरवाडे वय 23 राहणार कलानगर , निखिल श्रीकृष्ण पाटील वय 25 राहणार प्रेरणा नगर , श्रीकृष्ण वासुदेव सकाळ वय 37 राहणार दीनदयाल नगर , सर्व राहणार भुसावळातील असून असून त्यांच्याकडून १५ हजार ५६० रोख रक्कम मिळून आली म्हणून असून स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा मांग ५२ पत्त्याचा खेळ खेळताना व खेळवताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून १५ हजार ५६० रोख रक्कम मिळून आली म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून फिर्यादी पोकॉ ईश्वर संजय भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
गुुुरन १९६/२०२१ मुंबई जुगार ॲक्ट कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोहेकॉ सुनील जोशी,पोना उमाकांत पाटील,ईश्वर भालेराव, दिपक पाटील, होमगार्ड लीलाधर कपले अशांनी मिळून केली.



