भुसावळात जुगार अड्ड्यावर कारवाई ; 13 जणांवर गुन्हे दाखल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात विवेकानंद भागात योगेश अशोक पाटील यांच्या राहत्या घराच्या समोरील मोकळ्या मैदानात लाइटच्या उजेडात दिनांक १४ मे रोजी रात्रीच्या वेळेस झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना १३ जाण मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ शहरात विवेकानंद भागात योगेश अशोक पाटील त्यांच्या राहत्या घराच्या समोरील मोकळ्या मैदानात लाइटच्या उजेडात दिनांक १४/५/२०२१ रोजी ११.३० वाजेला रात्रीच्या सुमारास सागर देविदास तायडे राहणार गुलमोहर प्रेस्टिज , उमेश अशोक वाढे राहणार पांडुरंग नाथ नगर , तुषार सुखदेव डोळे राहणार न्यू हूडको कॉलनी , योगेश अशोक पाटील राहणार विवेकानंद नगर , शरद रामदास तराड राहणार ग्रीन पार्क , अमोल नामदेवराव खंडारे राहणार यशोदा हॉटेल जवळ , किरण नारायण पाटील पांडुरंग नगर , नितीन धनराज पाटील पांडुरंग नगर , सागर प्रकाश काटकर पांडुरंग नगर , नितीन साहेबराव महाजन, पांडुरंग नगर , मुकेश रमेश महाजन पांडुरंग नगर , योगेश सुधाकर भंगाळे, पांडुरंग नगर , उमेन्द्र प्रभाकर वाघचौरे पांडुरंग टॉकीज जवळ , सर्व राहणार भुसावळ शहरातील असून स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा मांग ५२ पत्त्याचा खेळ खेळताना व खेळवताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून ३३ हजार ३३० रोख रक्कम ,८० हजार २०० रुपयांचे १३ मोबाईल असे एकूण १ लाख १३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून फिर्यादी पोना रमण सुरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुुुरन १९६/२०२१ मुंबई जुगार ॲक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पो.हे.कॉ जयराम खोडपे पो.ना रविंद्र बि-हाडे, कृष्णा देशमुख ,रमन सुरळकर पो.कॉ.योगेश माळी, प्रशांत परदेशी,परेश बि-हाडे, विकास सातदिवे अशांनी मिळून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *