साकेगाव ग्रामपंचायतीचाआदर्श उपक्रम : दहा हजारांवर घरपट्टी भरणार्‍या ग्रामस्थांचा बक्षीसाने गौरव ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातिल साकेगाव ग्रामपंचायतीने कर वसूली करीता दहा हजारांवर ग्रा.पं.थकबाकी भरणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसासह वर्षभर मोफत आर.ओ.पाणी देण्याची घोषणा केलेल्या आवाहनाला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे .
या अंतर्गत पहिल्याच दिवशी एक लाखाची वसुली देणार्‍या दहा ग्रामस्थांचा गौरव करण्यात येवून बक्षीस देण्यात आले.
कुठल्याही गावात मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासह अनेक विकासात्मक कामे करण्यासाठी त्या गावातील महसुलाची वसुली महत्वाची ठरते मात्र अनेक गावांमध्ये वसुली होत नसल्याची बाब समोर असतांनाच तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीने आदर्श उपक्रम सुरू केला आहे. दहा हजारांवर ग्रा.पं.थकबाकी भरणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसासह वर्षभर मोफत आर.ओ.पाणी देण्याची घोषणा केली त्यास साकेगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते नुकताच बुधवार रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
पोलिस उपअधीक्षक वाकचौरे यांच्याहस्ते दहा हजारांच्या वर घरपट्टी भरणार्‍या तथा सर्वप्रथम 10 ग्रामस्थांनी घरपट्टी भरल्याने अशा 20 नागरीकांना मोफत पाण्याचे जार, डस्टबीन व वर्षभर मोफत आरो पाणी मिळण्यासाठी डिजिटल स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले
प्रसंगी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सपकाळे, हिंमत सोनवणे, गजानन कोळी, गजानन पवार, सागर सोनवाल, कुंदन कोळी, सचिन राजपूत, संतोष पाटील, साबीर पटेल, वासेफ पटेल, मुस्लिम समाज बांधवांचे मौलवी तसेच अन्य प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *