भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेले लॉकडाउन व कडक निर्बंध याअनुषंघाने १४ रोजी असलेल्या रमजान ईद व अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर शहरात सायंकाळी पोलिसांनी रूट मार्च काढले .

महाराष्ट्र राज्य सरकारने १५ मे २०२१ पर्यंत लॉकडाउन घोषित केले आहे. यादरम्यान रमजान ईद व अक्षय तृतीया हे दोघ सण एकत्र आल्याने बाजारात व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे एकीकडे सरकार कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे शहरातील लोक मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली करीत आहे.रूट मार्चचे प्रमुख उद्दिष्ट शासनाने घालून दिलेले निर्देश तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच आगामी येणारे सण हे घरातच साजरे करावे तसेच शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण व्हावा या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशावरून दिनांक १३ मे २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी डीवायएसपी नितीन गणापुरे ,बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत , सपोनि अनिल मोरे, कृष्णा भोये,गणेश धुमाळ,संदीप गोंटला,हरिष भोये तसेच अमरावती येथून बंदोबस्तासाठी आलेले आरसीपी एसआरपीएफ पथक व होमगार्ड यांचे पथकाने रूट मार्च काढण्यात आले .
रूट मार्चला शहरातील रेल्वे पोलीस चौकी जवळून प्रारंभ होवून जाम मोहल्ला , रजा टॉवर , खडका चौफुली , ईदगाह पर्यंत रूट मार्च काढण्यात आला .


