राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने फैजपूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

फैजपूर प्रतिनिधी:
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारी संकटकाळात रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत केंद्र सरकारने देशभरातील १८ वर्षापुढिल नागरिकांना कोवीड लसीकरण मोहीम हाती घेतली असून लस घेतल्यानंतर ६० दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही.
या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती विमोचन समितीच्या वतीने ०२ मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी सतपंथाचार्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते भारत माता व प्रभु श्रीरामांच्या प्रतिमा पुजन करुन रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश (पिंटू) राणे, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, अनिरुद्ध सरोदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


