भुसावळ {प्रतिनिधी ) –

तालुक्यातील
स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असून कर्मचारी वर्गाची सेंसर बायोमेट्रिक हजेरी पद्धत जिल्ह्यातील एकमेव स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी बायोमेट्रिक मशीनच्या उद्घाटन प्रसंगी केले .
प्रसंगी सरपंच आनंद ठाकरे संजय पाटील माजी सरपंच अनिल पाटील सरपंच पती विष्णू सोनवणे माणिक पाटील सुभाष कोळी डॉक्टर बाळासाहेब पाटील सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी बांधवांची व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती
साकेगाव ग्रामपंचायत प्रशासन सदैव विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात जिल्ह्यात अग्रेसर असल्यामुळे पायलेट प्रोजेक्ट व्हिलेज म्हणून सन्मानित झालेले आहे साकेगाव ग्रामपंचायत येथे तब्बल 25 कर्मचारी आहे त्यांची वेळोवेळी हजीरी डिजिटल बायोमेट्रिक पद्धतीने व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता थंब ऐवजी आय सेन्सर बायोमेट्रिक मशीन खरेदी करून एक मे कामगार दिन रोजी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते फित कापून मशीन चे उद्घाटन करण्यात आले ग्रामपंचायत प्रशासनाचा राज्यस्तरीय स्मार्ट विलेज निर्मितीच्या संकल्प असून लवकरच विविध विकासकामांच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन राज्यस्तरीय लौकिक मिळवेल असा विश्वास सरपंच ठाकरे यांनी प्रसंगी व्यक्त केला


