महाराणा प्रताप राजपुत समाज संघर्ष समिती भुसावळ तालुका तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न ; 20 रक्तदात्यांनी केले रक्तदान ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चा उद्रेक झाला असून आज मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासत होती.
रक्त पतपेढ्या कडे सुद्धा रक्ताच्या मागणीपेक्षा साठा कमी आहे.या सामाजिक भावनेतून
9मे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2मे2021 रविवार रोजी महाराणा प्रताप राजपूत समाज संघर्ष समिती भुसावळ तालुका द्वारा महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होतेे.

हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जी यांच्या प्रतिमेस प्रविणसिंह पाटील, बापुसाहेब भगतसिंग राजपूत,संजयसिंग चौहान,समाधान महाजन सर,संग्रामसिंह सूर्यवंशी,अभिजित पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
शिबिरात 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान चालू असतांना गरजू रुग्ण स्त्रीला O+ प्लाझ्मा ची गरज होती यावेळी रक्तदाते श्री नितिन ढाके यांच्यामार्फत गरज पूर्ण करण्यात आली.यामुळे त्या कुटुंबाने आणि संपूर्ण राजपूत समाजाने समाधान व्यक्त केले .

रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी यावल समाज अध्यक्ष कृष्णा पाटील,यशवंत चौधरी,अमोल पाटील,सुनील चौधरी,बि. एन.पाटील सर,हर्षल पाटील,सोनी ठाकूर,गोपी राजपूत,रोशनसिंग राजपूत,नितीन पाटील आणि समस्त राजपूत समाज भुसावळ तालुका यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *