भुसावळ (प्रतिनिधि )-
भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीच्या शहर अध्यक्ष पदी अडँ. अभिजित मेने यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी आमदार संजय सावकारे,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नि.तु. पाटील, कायदे आघाडी जिल्हा अध्यक्ष अडँ.प्रकाश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी यांची उपस्थिती होती
पक्षा तर्फे देण्यात आलेल्या या महत्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटका साठी काम करणार असल्याचा तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करून जनसेवा करणार असल्याचा मानस नुतन अध्यक्षांनी व्यक्त केला .



