वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे ; शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे ; शिवसेना भुसावळ तालुका तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;
भुसावळ (प्रतिनिधि )-
वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे अशी मागणी शिवसेना भुसावळ तालुका तर्फे करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे . जिल्हा शल्य चिकित्सक व तहसीलदार यांनाही निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे .
वरणगाव शहर परिसरातील ग्रामीण भाग व आयुध निर्माणी तसेच जवळच असलेल्या दिपनगर येथील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे . कोविड -१९ च्या साथीने जनता हवालदिल झाली असल्याने वरणगाव शहराच्या लोकसंख्येच्या विचार करतात ती जवळपास पन्नास हजार आहे वरणगाव शहर व ग्रामीण भागाचा विचार करता येथे कोविड -१९ च्या उपचारासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही तरी कोविड -१९ उपचारासाठी त्वरित कोविड -१९ सीसीसी सेंटर सुरू करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व स्टॉपची नेमणूक करून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही शिवसेनेच्यावतीने करण्यास तयार आहोत
असे शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी जिल्हा शल्य चिकित्सक तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना सांगितले तसेच वरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. जोशी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी देखील सकारात्मक चर्चा करून आपण उद्या बसून निर्णय घेऊ असे सांगितले तसेच
जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन आपण त्वरित कोविड -१९ रुग्णांसाठी सी सी सी सेंटर चालू करू असे आश्वासन दिले तसेच तहसीलदार यांनी त्वरित जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा अधिकारी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व ग्रामीण रुग्णालय आरोग्यअधिकारी यांच्याशी चर्चा करून त्वरित वरणगाव येथे सी सी सी सेंटर चालू करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले त्याबाबतीत कोणत्या ठिकाणी आपण कोविड -१९ रुग्णांसाठी सीसीसी सेंटरची व्यवस्था करू शकतो अशा जागा विषयी देखील चर्चा करण्यात आली त्वरित जागांची पाहणी करून कर्मचाऱ्यांची डॉक्टरांची नेमणूक करून कोविड -१९ रुग्णांसाठी सी सी सी सेंटर चालू करण्यात येईल तसेच जिल्हा शल्यचिकित्सक शिवसेनेने मागणी केल्याप्रमाणे ग्रामीण रुग्णालय वरणगावसाठी डॉक्टर जैन यांची नवीन नेमणूक करून वरणगावकर जनतेला दिलासा दिला आहे त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन , उपजिल्हा संघटक विलास मुळे , पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे , अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी ,निलेश ठाकूर हे उपस्थित असून त्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत . आतापर्यंत वरणगावला सीसीसी कोविड -१९ उपचार केंद्र व्हावे म्हणून नामदार गुलाबराव पाटील पालक मंत्री जळगाव यांच्या मार्गदर्शनाने व आमदार चंद्रकांत पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना जळगाव यांच्या सहकार्याने मार्गक्रमण चालू आहे सदर चे कोविड -१९ रुग्णांसाठी सीसीसी सेंटर उपलब्ध होण्यासाठी वरणगावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक परिश्रम घेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *