भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये लवकरच कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव जय गणेश फॉऊंडेशन तर्फे जळगांव सिव्हिल सर्जन कडे पाठविण्यात आलेला आहे या पार्श्वभूमिवर आज बुधवार रोजी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास म्युनिसिपल हायस्कूलची पाहणी केली.
सध्या स्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे अनेक पेशंटना बेड्स उपलब्ध होत नाही तर अनेकांना महागड़े दवाखाण्याचा खर्च परवडत नाही यासाठी भुसावळ शहरातील सामाजिक संघटना नागरिकांच्या सेवेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी”जय गणेश फॉऊंडेशन” कडून जिल्ह्या शल्य चिकित्सक जळगांव यांच्याकडे म्युन्सिपल हायस्कुलमध्ये १०० बेडचेे कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे अर्जानुसार दिनांक २८/४/२०२१ रोजी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी यांनी सिव्हिल सर्जन यांच्या आदेशावरून दुपारी १२ वाजेच्या सुमारास नूतन कोविड सेंटर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत की नाही याबाबत पाहणी केली याबाबत वरिष्ठांना रिपोर्ट सादर करणार असून लवकरच कोविड सेंटर सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला .



