मुंबई आणि गोरखपूर दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या ;

मुंबई आणि गोरखपूर दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई व गोरखपूर दरम्यान प्रवाशांकरीता आणखी ४ आरक्षित उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष

01323 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १.५.२०२१ आणि २.५.२०२१ (२ फे-या) रोजी १२.०० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.

01324 गोरखपूर येथून दि. २.५.२०२१ आणि ३.५.२०२१ (२ फे-या) रोजी २३.४५ वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.

संरचनाः १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित , ८ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : संपूर्ण आरक्षित 01323 विशेष गाडीचे विशेष शुल्कांसह बुकिंग २९.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

विशेष गाडीच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *