मुंबई –

ब्रेक द चेनच्या अंतर्गत सध्या सुरू असलेल्या राज्यातील कडक निर्बंधांना 15 मे पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.कोरोना ची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यांमध्ये 14 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. होते हे निर्बंध एक मे पहाटे सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील असे राज्य सरकारने जाहीर केले होते. दरम्यान कडक निर्बंध लागल्यानंतर राज्यात रुग्णसंख्या मध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे अर्थात या निर्बंधांचा रुग्ण संख्या कमी होण्यासाठी उपयोग होत असल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे सध्या सुरू असलेले निर्बंध हे वाढविण्यात यावे अशी अनेक मंत्र्यांनी मागणी केली होती. या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये राज्यातील लोक डाऊन अर्थात कडक निर्बंध हे 15 मे पर्यंत वाढविण्यात आलेले निर्णय घेण्यात आला आहे.


