जळगावात कोरोनाचा कहर सुरुच ; आज २३ जणांचा मृत्यू ;


जळगाव –

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. लॉकडाऊन लावूनही रुग्ण संख्या काही कमी होत नाहीय. आज दिवसभरात १ हजार १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ९९५ रुग्ण दिवसभरात बरे झाले.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ९२८ इतकी आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ५ हजार ९०१ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २३ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा २ हजार १२२ झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- १६३, जळगाव ग्रामीण- ५६, भुसावळ-४९, अमळनेर-४६, चोपडा- ५३, पाचोरा- ५९, भडगाव-३३, धरणगाव- २७, यावल- २६, एरंडोल- १००, जामनेर- ५९, रावेर- ९६, पारोळा- ३७, चाळीसगाव- ६४, मुक्ताईनगर- १७, बोदवड-१२० आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १०१२ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *