भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या व्यापारी पोलिस मित्र संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
‘ब्रेक द चेन’साठी राज्य सरकारने नियमावली लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्या बंद दुकानांमधून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या घटनांना आळा बसण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ यांनी व्यापारी पोलीस मित्र ही संकल्पना दोन दिवसांपूर्वी व्यापारी असोसिएशनच्या बैठकी मध्ये मांडली . त्यानुसार व्यापारी मित्रांनीं या संकल्पनेस भुसावळ शहरातुन सकारात्मकप्रतिसाद देत संकल्पना कार्यान्वित केली असून व्यापारी पोलीस मित्र पोलिसांसह रात्रीची गस्त घालत आहेत.
‘ ब्रेक द चेन’ साठी जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद आहेत. मार्केट, व्यापारी संकुल बंद असल्याने चोरट्याना चांगली संधी मिळते. या काळात रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची जास्त शक्यता असते. तर सद्यस्थितीमध्ये पोलीस दल देखील लॉकडाऊन बंदोबस्तामध्ये व्यस्त आहेत. अशावेळी शहरात चोरटे धुमाकूळ घालीत आहे म्हणून पोलिसांनी व्यापारी वर्गाकडून पोलीस मित्र म्हणून रात्रची गस्ती घालण्यासाठी मदत मिळायला पाहिजे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली.असल्याचे यानुसार भुसावळ उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले .
सदर संकल्पनेला व्यापारी वर्गातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सोमवारी (दि. २६) रोजीच्या मध्यरात्रीपासून या संकल्पनेची अंमलबजावणीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. व्यापारी पोलीस मित्र यांनी रात्री साडे अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष पोलिसांसोबत पायी गस्त घातली. यामध्ये विशाल वाधवानी, सनी वाधवानी, राहुल दोदानी, अजय नागराणी, प्रकाश चांदवानी, केशव गेलानी या व्यापारी मित्रांच्या दोन टीमने भुसावळ मुख्य बाजारपेठेमध्ये पोलिसां सोबत पायी गस्त घातली.यावेळी एपीआय अनिल मोरे यांनी या दरम्यान भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.
एपीआय कृष्णा भोये, एपीआय अनिल मोरे, एपीआय धुमाळ, एपीआय हरीश भोये हे पोलीस अधिकारी दररोज या व्यापारी मित्र पोलीसांना आवश्यक त्या पुढील सुचना देण्यात येणार आहेत. यापुढेही दररोज व्यापारी पोलीस मित्र ही संकल्पना भुसावळ शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. व्यापारी वर्गाकडून देखील या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *