यावल (प्रतिनिधी )- तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी यांनी जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथे सिलेंडर covid-19 करिता लावण्यासाठी एकूण चार लाख पाच हजार आठशे पंधरा रुपये रक्कम (4,05,815)शिक्षकांनी जमा केली
यावल तालुक्यात जेटी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथे covid-19 करिता ड्युरा सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवण्यासाठी रकमेची आवश्यकता होती त्यासाठी डॉ. निलेश पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल ,नईम शेख गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल यांनी तालुक्यातील सर्व जि प तसेच खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी यांना स्वइच्छेने देणगी स्वरूपात रक्कम द्यावी यासाठी आवाहन केले होते . सदर आवाहनाला प्रतिसाद देत तीनच दिवसात सर्व शिक्षकांनी एकूण चार लाख पाच हजार आठशे पंधरा रुपये (4,05,815) जमा करून फैजपूर येथे सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवणे कामी मदत केली एवढी मोठी रक्कम मदत करण्याचे कार्य जिल्ह्यातून प्रथमच यावल तालुक्यातील शिक्षकांनी केलेले आहे. सदर रक्कम ही तहसीलदार यावल यांचेकडे आज सुपूर्त करण्यात आली. सदर प्रसंगी डॉ.निलेश पाटील गटविकास अधिकारी ,नईम शेख गटशिक्षणाधिकारी ,प्रमोद कोळी गटसमन्वयक, योगेश इंगळे ,इम्तियाज फारूकी आणि कुंदन वायकोळे हे उपस्थित होते.
सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद–
यावल तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना मदतीसाठी आवाहन केले होते सर्वांनी आवाहनाला प्रतिसाद देत एक खूप मोठी रक्कम दिली. जिल्ह्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यास हातभार दिला त्यासाठी सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद..
नईम शेख
गटशिक्षणाधिकारी
प.स. यावल



