रुग्णांची फसवणूक करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करा : मुकेश गुंजाळ –


भुसावळ (प्रतिनिधी )- : राज्यातील रेमडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासह दोष संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची फसवणूक करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी भुसावळचे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असून त्याबाबत कारवाई होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना 7 एप्रिल रोजी ई मेल द्वारे पाठवण्यात आलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *