मुंबई –
राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 19 बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात किराणा दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सकाळी सात ते 11 या दरम्यान किराणा दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला.
किराणाचं दुकान दिवसभर उघडं असल्यामुळे अनेक जण किराणाच्या दुकानाच्या नावानं विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतायत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी 7 ते 11 या कालावधीत किराणामालाची दुकों उघडी ठेवण्याची सूचना केली. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की ,
कारण दिवसभर किराणाच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही. जिल्हाधिकार्यांच्या पातळीवर तो बदल ठेवू नये, असा निर्णय सर्वानुमते झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



