भुसावळ (प्रतिनिधी )-
तळवेल गावात जाण्यासाठी तळवेल फाटा व ऑडनस फॅक्टरी वरणगाव फाटा याच्या मधोमध असलेला 70 फूट रुंदीचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना विचारात न घेता चार पदरी महामार्गावरून रस्ता न जोडता राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करून घेऊन ग्रामस्थांच्या अडचणीत भर घालण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले असून त्याचा तीव्र विरोध शिवसेनेतर्फे करण्यात आला असून सदरचा रस्ता त्वरित राष्ट्रीय महामार्ग याला जोडून द्यावा तेथे प्रवाशांसाठी प्रवासी निवारा उभारावा व तो समांतर रस्ता ऑडनस फॅक्टरी वरणगाव फाट्यापर्यंत बनवून ग्रामस्थांचे अडचण दूर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर झालेले झाडेझुडपे काढून रस्ता मोकळा करण्याचे काम ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच उल्हास भारसके, शिवसेना उपतालुका संघटक प्रकाश कोळी ,गणप्रमुख किशोर कोळी , युवा सेना उपतालुका युवा अधिकारी रमेश धरणे यांच्यासह तळवेल गावातील शिवसैनिकांनी पूर्ण केले आहे व रस्ता मोकळा केला आहे.
प्रसंगी त्या ठिकाणी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि तात्काळ सदर रस्त्यातला समांतर रस्ता जोडून सत्तर फुटी रस्ता तळवेल सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गला जोडून तयार करून मिळण्यासाठी प्रयत्न केले संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित रस्ता पूर्ण करून देतो याबाबत आश्वासन दिले आहे हा रस्ता तयार झाल्याने ग्रामस्थांचा दोन किलोमीटरचा फेरा वाचणार असून शेतकऱ्यांसाठी सुविधा निर्माण होणार आहे यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न केले आहे,
प्रसंगी उपजिल्हा संघटक विलास मुळे पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे जिल्हा परिषद सदस्य सरला कोळी तळवेल चे सरपंच डॉ . सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील शाखाप्रमुख शंकर पाटील संदीप पाटील संजय कापसे अमोल कोळी भास्कर कोळी गणेश पाटील हर्षल चौधरी कुणाल महाजन सागर वंजारी रवींद्र कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते



