भुसावळात इलेक्ट्रीक दुकान फोडणारा आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ;


भुसावळ ( प्रतिनिधी )-
भुसावळात इलेक्ट्रॉनिक दुकान फोडण्याच्या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मसुक्या आवळल्या आहेत.हा आरोपी खंडवा लोहमार्ग पोलिसांनाही वॉण्टेड असल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.
भुसावळ बाजारपेठ हद्दीतील मॉडर्न रोड वरील सुरेंद्र वालवाणी (रा.हनुमान नगर, भुसावळ) यांचे हरी ओम इलेक्ट्रॉनिक दुकानात 17 ते 18 दरम्यान घरफोडी होवून चोरट्यांनी तब्बल दोन लाख 26 हजार 350 रुपयांचे टीव्ही, म्युझीक सिस्टीम, हेड फोन्स, पेन ड्राईव्ह लांबवले होते. या गुन्ह्यात सुरूवातीला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती तर अहमद उर्फ अटेक बशीर खान (24, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) हा पसार होता. तो जाम मोहल्ल्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे, सहा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, समाधान पाटील, विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *