भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ मंडळात रनिंग स्टाफचे कर्मचारी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करुन सुरक्षितपणे गाड्या चालविण्याचे काम करीत आहे. या कर्मचार्यांच्या न्यायोचित मागण्या युनियनद्वारे वारंवार प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतरही रेल्वे प्रशासनाचे प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्यामुळे रनिंग स्टाफ कर्मचारी त्रस्त झाले आहे. प्रशासनाच्या वाढत्या दबावामुळे तसेच मनमानी कारभारामुळे रनिंग कर्मचारी निराश
झाले आहेत.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने स्टाफ कर्मचार्यांच्या मागण्यांकरिता आंदोलनाने सुरुवात केली आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी द्वारसभा घेण्यात आली. त्यात आर.आर.निकम मंडळ सचिव, पुष्पेंद्र कापडे, मंडळाध्यक्ष ए.टी.खंबायत शाखासचिव यांनी प्रशासनाला द्वार सभेद्वारे चेतावनी देऊन प्रशासनाचा निषेध केला. यावेळी पूर्ण भुसावळ मंडळात द्वारसभा होणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता भुसावळ स्टेशन येथून मोर्चा काढून मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. द्वारसभेत रनिंग शाखेच्या 230 कर्मचार्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमात रनिंग स्टाफ कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा व उपस्थित रहावे, असे आवाहन आर.आर.निकम, पुष्पेंद्र कापडे यांनी केले आहे. आंदोलनानंतरही जर प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आर.आर.निकम, पुष्पेंद्र कापडे, आर.पी.भालेराव शाखाध्यक्ष यांनी दिला आहे. यशस्वीतेसाठी एस.बी.तळेकर, शाखा कोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड, अनिल मालविया, मो.असलम, एस.एस.वानखेडे, एच.के.चौरसिया, किरण नेमाडे, सचिन वाघ, डी.आर.सयम यांच्यासह रनिंग स्टाफने परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शाखा सचिव ए.टी.खंबायत तर आभार आर.पी.भालेराव यांनी मानले.



