भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील पंचशील नगरमधील रहिवाशी अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचीत असून त्यांच्या प्रलंबित विधायक कामाकरीता लोकशाहीच्या मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार ८ रोजी भुसावळ नगरपरीषदेवर धरणे,मोर्चा,आंदोलन करण्यात आले.
यावेळी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार हे भुसावळ नगरपरिषदेत अनुपस्थित होते. यामुळे आंदोलनकर्त्यांनी अर्धातास घोषणा करीत ठिय्या आंदोलन केले.
पंचशील नगर येथील विधायक कामे प्रलंबित असून सदर कामे भुसावळ नगरपरीषदेने त्वरीत मार्गी लावण्यासाठी मोर्चा काढण्यात आला .
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या मध्ये प्रामुख्याने पंचशील नगर येथील सर्व गोरगरीब जनतेचे घरपट्टी माफ करून कायमस्वरूपी 7/12 चा उतारा देण्यात यावा.
2) पंचशील नगर मधील काही लोकांची घरपट्टी 5 वर्षापासून नावावर करण्यात आलेली नाही. तरी त्वरीत ज्यांचे घरपट्टया नावावर नाही त्यांच्या घरपट्टया नावावर करण्यात यावे.
3) पंचशील नगर येथील जनतेचे घरकुल अंतर्गत घरकुल मंजूर करून लाभ देण्यात यावा व लाभांचि राशी रुपये बँक खात्यात त्वरीत जमा करण्यात यावी.
4) पंचशील नगर मधील मच्छी मार्केटच्या परीसरातील सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण करण्यात यावे, तसेच गटारीचे नुतनीकरण करण्यात यावे.
5) पंचशील नगर मधील खांबावरचे एल.ई.डी.लाईट तसेच हायमॉस्ट पोलवरील एल.ई.डी.लाईट नवीन लावण्यात यावे. पंचशील नगर मधील अमृत 6)योजनेअंतर्गत तातडीने कामाला सुरुवात करण्यात यावी.
7) पंचशील नगर येथील प्रवेश द्वाराजवळ समोरील मोठा नाला तसेच बुध्दविहाराच्या मागचा मोठा नाला,जे.सी.बी.ने कचरा, गाळ, माती, स्वच्छ करण्यात यावी व दोन्ही मोठया नाल्याला वॉल कंपाउड बांधण्यात यावे.या मागण्यांचा समावेश आहे .
दरम्यान मुन्ना सोनवणे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांच्यासोबत फोन व्दारे सवांद साधून चर्चा केली असता मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशावरून न.पा.चे सभा अधीक्षक परवेज शेख यांच्या उपस्थितीत मागण्याचे निवेदन देण्यात आले .



