दुःखद निधन वार्ता ; रोहित विजय नेरकर यांचे दुःखद निधन

भुसावळ (प्रतिनिधी)- विजय नेरकर यांचे सुपुत्र डॉ. रोहित विजय नेरकर (वय २४ वर्षे, MBBS) यांचे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मोटारसायकल अपघातानंतर सुरू असलेल्या औषधोपचारादरम्यान आज, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.३० वाजता दुःखद निधन झाले.

डॉ. रोहित हे अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ आणि सगळ्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. अल्पावधीतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली होती. त्यांच्या अकाली निधनाने नेरकर कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा उद्या, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता, पोलीस क्वार्टर्स, भुसावळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि नेरकर परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.