भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते रुपेशभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा व सदिच्छा भेट संपन्न ;

भुसावळ  ( प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री .ना. गुलाबराव पाटील  यांचे स्वकीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनी नुकतीच भुसावळ येथील प्रसिद्ध समाजसेवक रुपेशभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त अत्यंत उत्साहात हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या विशेष प्रसंगी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मा.नवलसिंग राजे पाटील यांच्या समवेत प्रमोद पाटील आणि जीवन पाटील (रेलकर) यांच्यासह भुसावळ शहरातील अनेक नागरिक, चाहते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रुपेशभाऊ देशमुख यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या सदिच्छा भेटीदरम्यान परिसरातील सामाजिक कार्यावर आणि विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. वाढदिवसाच्या या आनंददायी क्षणी उपस्थित सर्वच स्तरांमधील नागरिकांनी रुपेशभाऊ देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.