चोरी, घरफोडी प्रकरणातील 14 संशयितांची ओळख परेड –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील बाजारपेठ, शहर आणि तालुका पोलिस ठाण्यातील यादीवरील गुन्हेगार चोरी, घरफोडी प्रकरणातील 14 संशयितांची शनिवारी डीवायएसपी कार्यालयात ओळख परेड झाली. सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी ओळख परेड घेतली. तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडीप्रकरणी गुन्हे दाखल असलेले संशयित आणि यादीवरील गुन्हेगारांना शनिवारी तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात बोलावले होते.
यावेळी प्रत्येक संशयिताची वैयक्तीक चौकशी करण्यात आली. संंबंधितांची कौटुंबिक स्थिती, उदरनिर्वाहाचे साधन याबाबत पोलिस अधिकार्‍यांनी चौकशी केली. तसेच आगामी काळात शहरासह तालुक्यात चोरी, घरफोडीची घटना घडल्यास संबंधितांची चौकशी केली जाईल. त्यात सहभाग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा पोलिस अधिकार्‍यांनी दिला. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि डीबी पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *