भुसावळ (प्रतिनिधी) –

या वर्षातील पहिल्याच महिन्या शासनामार्फत राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण हे मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्याचा आज दिनांक 31 रोजी संपूर्ण जिल्ह्यात शुभारंभ झाले असून त्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी , अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका ह्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांनच्या पालकांना जाहीर आव्हान करत आहे आपल्या बाळांना पोलिओचा डोस पाजून घ्या त्या साठी आपल्या जवळच्या बुथवर, अंगणवाडी, शाळा, बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, टोलनाके, सर्व दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र,तसेच खेड्यातील व शहरातील कान्याकोपऱ्या जाऊन एक ही मुलं लसीकरणा वाचून सुटू नहे म्हणून परिश्रम घेत आहे तर भुसावळ शहरातील आशा आरोग्य सेविका प्रिया नटवरसिंग पाटील आणि त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला अथर्व नटवरसिंग पाटील हा आपल्या आई सोबत शहरातील गल्लीबोळात जाऊन पोलिओ लसीकरणाची जनजागृती करीत असून आई आरोग्य सेविका प्रिया पाटील लसीकरण मोहीम राबवत आहे यामुळे या दोन वर्षांच्या चिमुकला अथर्व चे जिल्ह्यात कौतुक होत असून तो आई सोबत जाऊन आपल्या 5 वर्षाखालील बाळा ला लसीकरण करून घ्या ,दो बुंद जिंदगी के, तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी दोन थेंब महत्त्वाचे आहे असे समजाऊन सांगत आहे वडील नटवरसिंग पाटील हे घरचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी कामाला जात असतात तर आई आरोग्य सेविका त्यामुळे अथर्व चा घरी कोणी सांभाळ करणारा नसल्याने चिमुकल्या अथर्व ला आई सोबतच शहर भर पाईपाई फिरावे लागत आहे पण यामुळे अर्थव हा आईला मदत ऑन करीत असतो पोलिओची जनजागृती करीत असल्यामुळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, व कर्मचाऱ्यांचा पण या दोन वर्षांच्या चिमुकल्या अथर्व मुळे आत्मविश्वास वाढत असून या 2021 वर्षांच्या पहिल्याच पोलिओ लसीकरणाची मोहीम घरोघरी जाऊन आनंदात लसीकरण राबविण्यात येत आहे


