शिवचरण उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेट जाहीर

मुक्ताईनगर

शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांना नुकतीच ग्लोबल पीस ऑफ युनिव्हर्सिटी अमेरिकेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मानद पीएचडी नुकतीच जाहीर केली तसे पत्रही उज्जैनकर यांना नुकतेच मिळाले
उज्जैनकर हे नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे गेल्या २४ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत या काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तंबाखू मुक्त अभियान, स्वच्छता अभियान, बालकवि संमेलनाचे आयोजन, तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत नेत्रतपासणी व जनरल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वेळोवेळी केलेले आहे.
उज्जैनकर गेल्या २२ वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या चळवळीमध्ये १४ वर्ष सक्रिय कार्य केलेले आहे त्याचप्रमाणे स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते राजीव भाई दीक्षित यांच्या कार्यक्रमा निमित्त मुक्ताईनगर व उचंदा या ठिकाणी उज्जैनकर यांनी कु-हा- काकोडा येथून १६ विद्यार्थ्यांची सायकल रॅली काढली होती त्यावेळी राजीवभाई दीक्षित यांनी उज्जैनकर यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर गौरव केला होता त्याचप्रमाणे कु-हा- काकोडा या ठिकाणी आठ वर्ष शारदा बालवाडी, अंगणवाडी महिला केंद्र चालविले आणि टायपिंग इन्स्टिट्यूट सुद्धा उज्जैनकर यांनी सुरू केलेले होते त्यांच्या शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या १२ वर्षापासून तालुक्यामध्ये विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून २८७ रुग्णांचे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया केलेले आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी ते दर वर्षी दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा त्याचप्रमाणे राज्यातील विविध क्षेत्रातील व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्काराने सन्मानित करतात तसेच या लोकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ज्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले आहेत अशा ४१ आदर्श शिक्षकांना आदर्श शिक्षक ई पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच जे डॉक्टर्स, नर्सेस, पत्रकार, समाजसेवक, कलाकार, शिक्षक हे कोरोना काळात मदत, सेवा करत आहेत महाराष्ट्रातील अशा १२६८ मान्यवरांना कोरोना योद्धा गौरव प्रमाणपत्राने ऑनलाइन गौरवलेले आहे.तसेच ए.व्ही.जी. फिल्म अंड प्रोडक्शनच्या सहकार्याने उज्जैनकर यांनी महाफेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे आयोजन केले यामध्ये महाराष्ट्रासह, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटका, तेलंगणा या राज्यातील तसेच नेदरलँड, सिंगापूर व ऑस्ट्रेलिया या देशातील अशा १५५ नामवंत मराठी व्याख्यात्यांनी या फेसबुक लाइव्ह व्याख्यानमालेत सहभाग नोंदवला या व्याख्यानमालेचा उज्जैनकर यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाला पुरेपूर उपयोग करून दिला.
उज्जैनकर हे विविध संघटनांशी जोडलेले आहेत ते अंकुर साहित्य संघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक असून शिक्षक संघटनेचे सुद्धा तालुका अध्यक्ष आहेत भुसावळ माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढी मध्ये सुद्धा ते संचालक असून ते केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संघटन सचिव पदी सुद्धा गेल्या वर्षापासून सक्रिय कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी ही संघटना महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य केलेले आहे एकंदरीत त्यांच्या सामाजिक कार्याविषयी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले यांनी उज्जैनकर यांच्या नावाची शिफारस ग्लोबल पीस ऑफ युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडे शिफारस करून उज्जैनकर यांना मानद पीएचडीचे निवड पत्र नुकतेच प्राप्त झाले ही पीएचडी उज्जैनकर यांना पुढील महिन्यात सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे उज्जैनकर यांना जाहीर झालेल्या मानद डॉक्टरेट मुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, कला व आरोग्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मेसेज, फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *